दोन सख्ख्या शेजारणींची ही कहाणी आहे. प्रधान आणि देशमुख दोघे सख्खे शेजारी. दोघांकडे सालाबादप्रमाणे गणपती बसतो आणि सगळ्यांना उत्सुकता असते ती त्यांच्याकडे असणाऱ्या चमचमीत, खमंग, स्वादिष्ट, पौष्टिक प्रसादाची.
प्रधान काकूंनी किचन रिनोव्हेशनचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते आणि रोज बाहेरून येणाऱ्या हॉटेलच्या पार्सल ने आणि किचनचे काम करायाला येणाऱ्या माणसांनी अख्या बिल्डिंगला हळूहळू समजले. त्यामुळे यंदाचा प्रसाद म्हणजे पर्वणीच असणार.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देशमुख काकु बँकेत कामाला आहेत. त्यांची सर्व कामे अगदी फिक्स डिपॉझिट ठेवीसारखी गुपचूप असतात. देशमुखांकडे किचन लावण्याचे काम चालू होईपर्यंत शेजारी प्रधान काकूंना आणि बिल्डिंग मध्ये कोणालाही माहित नव्हते. मुख्य गोष्ट म्हणजे गडबड नाही, गोंधळ नाही, बाई आरामात खुर्चीत निवांत बसून आपले काम करीत होत्या. मधेच फोनवर गप्पा चालू होत्या.
आज प्रधान काकू काकांवर भडकलेल्या दिसल्या कारणही तसेच होते. त्यांच्याकडे अजून किचनचे काम चालू होते. रोजच्या होणाऱ्या आवराआवरीने त्या कंटाळल्या होत्या आणि तोंडावर गणपती सण आला होता.
प्रधान काकूंना सूत्रांकडून असे समजते कि देशमुख काकूंकडे ‘अधिरा’ किचन बसले आहे. शेजारी एवढ्या कमी दिवसात किचन कसे लागले ते जाणून घेण्यासाठी आणि ते बघण्यासाठी प्रधान काकू ‘अधिर’ झाल्या आहेत. तर मंडळी ही उत्सुकता तुमच्याही शिगेला पोहोचली असल्यास आजच फेसबुक आणि इंस्टाग्राम वर टाईप करा आणि जाणून घ्या अधिरा बद्दल बरेच काही तुमच्या फायद्याचे …. अधिरा ..हर माँ कि पसंद अधिरा किचन.