स्वीटू नावाप्रमाणेच लाघवी, माझी शाळेपासूनची मैत्रीण, गोरीपान, एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीतल्या एका बरोबर तिचे सूत जुळले. तसा तिच्यापेक्षा तो डावाच पण लव्ह-मॅरेज… म्हणतात ना… मिया बीवी राजी…. लग्न झाल्यानंतर आमचे फोनवरून बोलणे व्हायचे. ती माहेरी आली कि मला नेहमी भेटून जायची. दर वेळेस आली कि मला येण्याचा आग्रह करायची. एक दिवस मुलूंड ला कामानिमित्त गेले होते, गाड्यांचा गोंधळ होता, स्टेशनवर तुडुंब गर्दी होती, मनात आले कि चला तिच्याकडे जावे, तिला फोन केला तर ती घरी होती. रिक्षाने तिच्या घरी गेले, तिलापण खूप आनंद झाला. तिने तिच्या नवऱ्याची ओळख करून दिली.
तुम्ही गप्पा मारा मी आतमध्ये आहे, म्हणत तो आत गेला. थोड्या वेळाने गरमागरम बटाटे वडे घेऊन तो बाहेर आला. मला कौतुक वाटले, स्वीटू म्हणाली, ‘आमच्याकडे समीर पण कामे करतो, ती एक गम्मत आहे, आम्ही एकाच कंपनीमध्ये असताना वर्तमानपत्रात जाहिरात आली होती, त्यात बायको बरोबर नवराही काम करताना दाखवले होते, समीरला म्हटले, जाहिरातीत किती छान दाखवतात, प्रत्यक्षात कोणता नवरा काम करेल? तो म्हणाला होता, ‘जर आपण दोघेही संसाराला हातभार लावणार आहोत, तर मी तुला मदत करण्यात काही वावगं नाही आणि कोणतेही काम कमी जास्त नसते, तो बोलला तसाच निघाला अगदी ‘अधिरा’ सारखा. मी उत्सुकतेने स्वीटूला विचारले, ‘आता हि ‘अधिरा’ कोण? जाहिरातीत दाखवलेली ती अधिरा आम्ही घरी घेऊन आलो आणि तिच्यामुळेच आमचे दोघांचे नाते आजही फ्रेंड्स सारखेच टिकले आहे. तिला म्हटले, ‘स्वीटू तू लकी आहेस तुला असा नवरा मिळाला, नाहीतर आमचे हे साधी कपबशी सुद्धा उचलत नाहीत. तेव्हा दोघांनीही मला सांगितले, ‘अधिरामुळे आमची कामं सुटसुटीत होतात त्यामुळे ती करण्यात मजाही येते. तू हि अधिराचा अनुभव घे, माझ्याप्रमाणे तुझ्या संसारातही गोडवा येईल. तिची माहिती जाणून घ्यायची असल्यास फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ‘अधिरा’ (Adhira) टाईप कर आणि बाकीच्यांनाही शेअर कर… क्योंकी #हर_माँ_कि_पसंद_अधिरा_किचन….